Jarange Patil । मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे सातत्याने आंदोलन करत आहेत. आता त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक बुधवारी झाली. या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा झाली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे नेतेही सहभागी झाले होते. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली. तसेच वंचित बहुजन आघाडीने कोणत्याही पक्षाशी युती न करता 27 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.
Narendra Modi । नरेंद्र मोदींची शरद पवारांवर नाव न घेता टीका; म्हणाले, “त्यावेळी कृषीमंत्री…”
बैठकीत वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा मतदारसंघांची यादीही देण्यात आली. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने 4 महत्त्वाचे प्रस्ताव महाविकास आघाडीला दिले आहेत. यावर महाविकास आघाडीचे नेते काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आम्ही गेल्या जून-जुलैमध्ये मतदारसंघांची यादी तयार केली होती. ती यादी आम्ही महाविकास आघाडीला दिली आहे. यातील काही जागा वगळता अन्य जागांवर महाविकास आघाडीशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे.
Viral Video । पाकिस्तानातून समोर आला धक्कादायक व्हिडीओ; पाहून तुम्हालाही बसेल धक्का
ते म्हणाले, “यासोबतच आम्ही आणखी 4 मागण्या ठेवल्या आहेत. जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉ.अभिजित वैद्य हे महाविकास आघाडीचे संयुक्त उमेदवार असावेत, असा प्रस्ताव होता. आम्ही एकूण 27 जागा प्रस्तावित केल्या आहेत. यापैकी काही जागांव्यतिरिक्त आम्ही इतर सर्व जागांवर चर्चा करण्यास तयार आहोत.
Sharad Pawar group । मनोज जरांगेंच्या SIT तपासावर शरद पवार गटाचे सर्वात मोठे वक्तव्य!