
Manoj Jarange Patil । मराठा समाजाचे आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन सुरू आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरु राहील अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. अखेर राज्य मागासवर्गाचा अहवाल (State Backward Classes Report) समोर आला आहे. या अधिवेशनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मराठा समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचे ते ठरले आहे. यावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest marathi news)
Maratha Reservation । सर्वात मोठी बातमी आली समोर! मराठा समाजाला इतके टक्के आरक्षण मिळणार
राज्य मागासवर्गाच्या अहवालात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळणार असल्याची तरतूद आहे. पण ही तरतूद मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मान्य नाही. सगेसोयरे शब्दाची अंमल बजावणी करा, अशी मागणी जरांगे पाटील हे अनेक दिवसांपासून करत आहेत. 10 टक्के आरक्षण मराठा समाजाचं नुकसान करणारं आहे. या आरक्षणाचा मराठा समाजाला काहीही उपयोग होणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 30 च्या खंड एकमध्ये निर्दिष्ट केलेल्या अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था व्यतिरिक्त इतर शैक्षणिक संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्था मग त्या राज्याकडून अनुदान प्राप्त असो किंवा अनुदान प्राप्त नसो यांमधील प्रवेशाचे एकूण जागांच्या दहा टक्के आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील आणि पदांवरील सरळ सेवा भरतीचे एकूण नियुक्तांच्या दहा टक्के आरक्षण सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी स्वतंत्रपणे राखून ठेवले जाणार आहे.