Manoj Jarange Patil । सर्वात मोठी बातमी! जरांगे पाटील लढवणार विधानसभेची निवडणूक

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । बीड : मागील काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आक्रमक झाले आहेत. आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही, अशी भूमिकाच जरांगे पाटील यांनी घेतली आहे. अशातच जरांगे पाटील यांनी सरकारने आरक्षण दिलं तर ठीक नाहीतर पुढील विधानसभा निवडणूक (Assembly Elections) लढवण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest marathi news)

Ashok Chavan । अशोक चव्हाणांबाबत काँग्रेसमधून धक्कादायक बातमी समोर!

नुकतीच जरांगे पाटील यांनी बीड जाहीर सभा घेतली, त्यावेळी ते बोलत होते. “सरकारने आरक्षण दिलं तर आपल्याला निवडणुकीसंदर्भात काहीच देणं घेणं नाहीही निवडणूक समुद्रासारखी असून ती आपली टप्प्यात आहे. त्यामुळे सगळ्यांनी मतदान करा. त्यांना बटनच सापडलं नाही पाहिजे. जवळपास ९२ मतदारसंघावर मराठ्यांचे वर्चस्व आहे,” असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde । निवडणुकीच्या तोंड्यावर एकनाथ शिंदे यांचे सर्वात मोठे वक्तव्य!

पुढे जरांगे पाटील म्हणाले की, “सगळ्या जाती धर्मांचे उमेदवार एकत्र आहेत. १६० उमेदवार आपलेच आहेत. जर राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल तर आपल्याला निवडणुकीचे काही देणेघेणे नाही, पण जर आरक्षण दिल नाही तर तयारीला लागा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवाना केलं आहे.

Loksabha Election २०२४ । सर्वात मोठी बातमी! वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का, छाननीत उमेदवाराचा अर्ज बाद

Spread the love