Maratha Reservation । सध्या मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मागील अनेक दिवसापासून मराठा आरक्षणासाठी लढत असणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाला सगळ्यात मोठे यश आले आहे. (Manoj Jarange Patil Strike) राज्य सरकारने मध्यरात्री अध्यादेश काढले असून मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहे. (Latest marathi news)
सरकारने याबाबतचा जीआर शनिवारी रात्री तयार केला होता. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे नवीन जीआर सुपूर्द केला आहे. यात मराठा समाजातर्फे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांचा समावेश आहे. मनोज जरांगे पाटील यांनी हा जीआर स्वीकारत आंदोलन मागे घेत आहे, असे स्पष्ट केलं आहे.
Maratha Aarakshan । मराठा समाजाच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या? पाहा संपूर्ण यादी
मराठा समाजाच्या मान्य झाल्या ‘या’ मागण्या
- नोंदी मिळाल्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार
- राज्यभरात ५७ लाख नोंदी मिळाल्या आहेत. आतापर्यंत ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र दिले गेले आहे. याचा डेटा मराठा समाजाला मिळणार.
- सगे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळणार
- शिंदे समिती रद्द होणार नाही
- अंतरवाली सराटीसह मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे
- मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती होणार नाही. समजा भरती केलीच, तर मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवणार
- आरक्षण मिळेपर्यंत आणि मराठा समाजातील सर्वांना शंभर टक्के शिक्षण मोफत मिळणार
- ज्या महाराष्ट्राच्या मराठ्यांकडे कुणबीची नोंद नाही, त्या बांधवांना मोफत शपथपत्र करुन मिळणार