Jayakwadi Dam Water Storage । यावर्षी जून महिना संपूर्ण कोरडा गेला असून जुलै महिन्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. यावेळी शेतकऱ्यांची जुलै मध्ये फक्त पेरणी झाली. यानंतर ऑगस्ट महिना सुरु होताच पावसाने उघडीप दिली. दरम्यान, ऑगस्ट महिन्याचे 15 दिवस उलटून देखील मराठवाड्यात (Marathwada) जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे या ठिकाणचे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. या ठिकाणी अनेक प्रकल्पातील पाणीसाठा (Water Storage) खूप कमी आहे. त्यामुळे जर लवकर मुसळधार पाऊस झाला नाही तर आगामी काळात येथील नागिरकांना पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागेल.
मराठवाड्यातील जायकवाडी धरणावर अनेकजण अवलंबून आहेत. मात्र जायकवाडी (Jayakwadi) धरणात केवळ 34.11 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षी आजच्या घडीला याच जायकवाडी धरणात 94.99 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मात्र यावेळी पाणीसाठा कमी असल्यामुळे नागरिक चिंतेत आहेत.
जायकवाडी धरणाची पाणीसाठा परिस्थिती कशी आहे?
- धरणाची पाणी पातळी फुटामध्ये : 1507.13 फूट
- मीटरमध्ये : 459.373 मीटर
- एकूण पाणीसाठा दलघमी : 1478.589 दलघमी
- जिवंत पाणीसाठा दलघमी : 740.483 दलघमी
- पाणीसाठा एकूण टक्केवारी : 34.11 टक्के
- जायकवाडी धरण बाष्पीभवन : 0.586
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट
जुलै मध्ये झालेल्या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती मात्र जुलै नंतर पाऊस नसल्याने शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीच संकट घोंगावत आहे. मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पिके चांगली उगवून आली आहेत मात्र पाण्याअभावी सुकू लागली आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात पाऊस पडला नाहीतर पिके जाळून जाण्याची शक्यता आहे.