![Jayant Patil. Breaking! ED notice to Jayant Patil again](http://elokhit.com/wp-content/uploads/2023/05/Jayant-Patil.jpg)
सध्या एक म्हत्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आयएल अँड एफएस प्रकरणी पुन्हा ‘ईडी’ची नोटीस आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे. २२ मे ला जयंत पाटील यांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ED notice again to NCP state president Jayant Patil in IL&FS case
Adah Sharma । सर्वात मोठी बातमी! केरळ स्टोरीच्या अदा शर्माचा अपघात
ईडीने याआधी देखील जयंत पाटील यांना नोटीस बजावली होती. मात्र यावेळी जयंत पाटील यांनी जवळच्या नातेवाईकांचे दोन दिवसांत लग्न समारंभ असल्याने आपण चौकशीसाठी हजर राहू शकत नाही आणि त्यामुळे चौकशीसाठी वेळ वाढवून मिळावी, असे पत्र पाठवून चौकशीची वेळ देखील वाढवून घेतली होती.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित काही संस्थांना ‘आयएल अँड एफएस’ प्रकरणातील काही आरोपी कंपन्यांनी ‘कमिशन रक्कम’ दिल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यामुळे आता याबाबत त्यांची चौकशी होणार आहे. यासाठी २२ मे ला जयंत पाटील यांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
Fact check | जेठालाल फेम दिलीप जोशीकडे आहे कोट्यवधी रुपयांची संपत्ती; आकडा एकूण व्हाल थक्क