बहुचर्चित सत्तासंघर्षाच्या निकालादिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. आयएल अँड एफएस कंपनीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जयंत पाटील यांना ही नोटीस आली होती. दरम्यान या प्रकरणी काल (ता.२२) ईडीकडून (ED) जयंत पाटील यांची चौकशी झाली. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.
धक्कादायक! पत्नीला ९ वेगवेगळ्या पुरुषांसोबत संबंध ठेवायला लावले आणि नंतर…
“तपास यंत्रणांचा चौकशीचा अधिकार आहे. मात्र सत्ताधाऱ्यांकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा चुकीचा वापर सुरू आहे. भाजपमध्ये असणाऱ्या नेत्यांची चौकशी होत नाही. त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी याबाबत विधान केले आहे. भाजपमध्ये गेल्यापासून आम्हाला सुखाची झोप लागते असे त्या पक्षातील नेतेच स्वतःहून बोलतात. ” असे अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
तसेच यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात झालेल्या घटनेवरून सुरू असलेल्या वादावर भाष्य केले आहे. मंदिराच्या मुद्द्यात राजकारण आणू नका. त्र्यंबकेश्वर मध्ये मागील १०० वर्षांपासून धूप दाखवण्याची प्रथा आहे. राज्यात दंगली आटोक्यात याव्यात यासाठी फडणवीसांनी लक्ष घातले पाहिजे. तसेच पोलिसांना कारवाई करण्यासाठी फडणवीसांनी मोकळीक द्यायला हवी. असे म्हणत अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना सल्ले दिले आहेत.