Jayant Patil । अखेर महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) जागा वाटप जाहीर झालं आहे. महाविकास आघाडीत घटक पक्ष असणाऱ्या ठाकरे गटाला 21 जागा, शरद पवार गटाला 10 जागा आणि काँग्रेसला 17 जागा देण्यात आल्या आहेत. यात सांगलीमधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला दिली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तयारीला लागले आहेत. (Latest marathi news)
Nana Patole । नाना पटोलेंच्या कार अपघातप्रकरणी धक्कादायक बातमी समोर
याच पार्श्वभूमीवर इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी सगळ्यांना घासून-पुसून काम करायच आहे. कोणाच्या घरी, कोणी चहा पिऊन गेलेले, मला चालणार नाही. जरी कोणीही आले, घरात बसले, आम्ही काय करू, असला धंदा बंद करा. समजा अचानक कोणी घरी आले तर तुम्ही घरी जाऊ नका, बाहेर जा,” असा दम जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांना भरला आहे.
“सध्या निवडणुकांचे वातावरण असल्याने तुमचे वैयक्तीक संबंध असतील ते इलेक्शननंतर. आपल्याला महाविकास आघाडीच्या उमेदवारास निवडून आणायचे आहे. लोकसभेची ही निवडणूक म्हणजे विधानसभेच्या आधीची रंगीत तालीम असल्याने तुम्ही बुथचे नियोजन करा. आपणास मतदारसंघात शेवटच्या मतदारांपर्यंत जावे लागेल,” असेही जयंत पाटलांनी सांगितले आहे.