Jayant Patil । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण (Jayant Patil infected with dengue) झाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील डेंग्यूची लागण झाली होती. त्यानंतर अजित पवार बरेच दिवस कार्यक्रमांमध्ये त्याचबरोबर माध्यमांसमोर आले नाहीत. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी प्रकृती स्थिर झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) कार्यक्रमांना उपस्थित राहू लागले. एकीकडे अजित पवार डेंग्यूतुन सावरले असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे दुसरे मोठे नेते जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण झाली आहे. (Latest Marathi News)
सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवस विश्रांती घेऊन शक्य तितक्या लवकर दैनंदिन आणि पक्षाच्या कामकाजाला सुरुवात करणार अशी प्रतिक्रिया देखील जयंत पाटील यांनी दिली आहे. जयंत पाटील हे शरद पवार गटाचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना देखील कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
आगामी काळात लोकसभेची निवडणूक असणार आहे त्यामुळे जयंत पाटील यांनी आजारपणातून लवकर बाहेर पडणं हे पक्षासाठी महत्त्वाचा आहे. दरम्यान जयंत पाटील यांच्या कार्यालयाकडून देखील या वृत्तावर दुजोरा देण्यात आला आहे. जयंत पाटील यांना डेंगूची लागण झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
Supriya Sule । शरद पवार आणि अजित पवार आतून एकत्र आहेत का? सुप्रिया सुळे म्हणाल्या…