Site icon e लोकहित | Marathi News

Jayant Patil । राजकारणातून सर्वात मोठी बातमी! जयंत पाटील भाजपत जाणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Jayant Patil

Jayant Patil । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील नाराजगी आणि भाजपकडे (BJP) जाण्याची चर्चा पुन्हा एकदा चांगलीच रंगली आहे. शरद पवार गटाचे प्रमुख जयंत पाटील यांनी पक्षातील अस्वस्थतेवर भाष्य केल्याचे शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते, रोहित पवार वारंवार जयंत पाटील यांचा अपमान करतात, त्यामुळे पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांनी आणखी स्पष्ट केले की, निवडणुकीच्या तोंडावर कोणीही कुठेही जाऊ शकते आणि आपल्या गटात किती जण येतात हे लवकरच कळेल.

Badlapur Case Update । बदलापूर अत्याचार प्रकरण: एसआयटी चौकशीत धक्कादायक माहिती

दुसऱ्या बाजूला, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जळगाव जिल्ह्यातील दौऱ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी विरोध प्रदर्शन केले. या संदर्भात संजय शिरसाट यांनी टिप्पणी केली की, दानवे यांचे विरोधाचे कारण काय आहे हे स्पष्ट नाही. त्यांनी विरोधाची नौटंकी केली असून, यास दुसरा शब्द नाही, असे शिरसाट म्हणाले.

Accident News । गाईला वाचवण्याच्या नादात शिवशाही बसचा भीषण अपघात, २८ प्रवाशी जखमी तर एकजणाचा मृत्यू

संजय राऊतांवर शिरसाटांनी कठोर टीका केली आहे. राऊतांवर “डोकं फिरलेला” आणि “पागल खाण्याच्या” आरोपांसह टिप्पणी केली आहे. त्यांनी असेही म्हटले की, जनतेचा पैसा दुसऱ्या देशात जाण्याऐवजी देशातच राहायला हवा आणि आपल्या संपत्तीला देशातच ठेवावे लागेल.

Share Market Holiday l कृष्ण जन्माष्टमीला शेअर मार्केटला सुट्टी राहणार का? वाचा महत्वाची माहिती

शिरसाटांनी राज ठाकरे यांची प्रशंसा केली असून, त्यांनी दलाली करत नाही आणि देशाच्या उन्नतीसाठी कार्यरत आहेत, असे म्हटले. मोदींनी देशासाठी बलिदान दिले असून, त्यांच्यावर दहा वर्षांत कोणतेही आरोप झालेले नाहीत, असे शिरसाटांनी सांगितले.

Maharashtra Crime l महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! पुन्हा एका मुलीवर बलात्कार

Spread the love
Exit mobile version