राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Aavhad) यांच्याबाबत एक ऑडिओ क्लिप नुकतीच व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या कुटुंबातील व्यक्तींना जीवे मारण्याबाबत संभाषण आहे. यामध्ये एक व्यक्ती बोलत असून ती जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि जावयाला मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यांनतर आता याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी फेसबूक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
परदेशात राहणारी तीन वर्षीय मुलगी गाते शिवाजी महाराजांचे पोवाडे; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद
जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुक पोस्ट करत लिहिले की, “ज्या नताशाला मी तीच्या जन्मानंतर साधं बोटही कधी लावलं नाही. किंवा ओरडलोही नाही. तीच्याबद्दल एक व्यक्ती फिल्डींग लावून मारुन टाकेन हे बोलतो. तेव्हा प्रचंड राग येतो. अस्वस्थता येते. तुम्हीच मला सांगा एक राजकीय नेता म्हणून हे सगळं सहन करायचं. एक पिता म्हणून हे सगळं सहन करायचं. आणि भूमिका काय घ्यायची ? घाबरुन घरी बसायचं, का उघडपणाने मैदानात यायचं.”
अदानी झाले आनंदी! वित्तीय आयोगाने दिली क्लीन चिट
त्याचबरोबर त्यांनी पुढे लिहिले की, “कोण आहे बाबाजी ? बाबाजी म्हणजे दाऊद इब्राहीमचा हस्तक. जे जे हत्या शुटआऊट मधील पहिल्या पाच जणांमधील एक आरोपी. स्वत:चं मुंबईमध्ये प्रचंड नाव असलेला. त्याच्या हस्तकांकरवी जावयाचा आणि मुलीचा मर्डर होणार. हे ऐकल्यानंतर एका बापाला काय वाटल असेल. राजकारण बाजूला ठेवा. पण, कधीतरी ह्या गोष्टीचा देखिल विचार करा.” अशी फेसबुक पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
बॉयफ्रेंड रुसला म्हणुन तिने लिहिले पत्र; म्हणाली, “लव्ह यू माझा कबुतर, जानू, फौजी, टमाटर रसगुल्ला…”