
Taarak Mehta । आज ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ulta Chashma) ही मालिका घराघरात पोहोचली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र खळखळवून हसायला भाग पाडते. या मालिकेतील जेठालालचे (Jethalal) पात्र सर्वांना आवडते. परंतु तुम्हाला आता जेठालाल या मालीकेत दिसणार नाही. कारण जेठालाल उर्फ अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) मालिकेमधून ब्रेक घेणार आहेत. याबाबत दिलीप जोशी यांनी माहिती दिली आहे. (Latest Marathi News)
Shivsena । बिग ब्रेकिंग! राहुल नार्वेकरांविरोधात ठाकरे गटाची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव
दरम्यान, दिलीप जोशी हे आपल्या कुटुंबासह टांझानियाला जाणार आहेत. यासाठी दिलीप जोशी यांनी या मालिकेमधून काही दिवसांचा ब्रेक घेतला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याबाबत सोशल मीडियावर (Social media) एका व्हिडीओच्या माध्यमातून दिलीप जोशी यांनी आपल्या पोस्टमध्ये ब्रेक घेण्याच्या कारणाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे तुम्हाला जेठालाल काही दिवस या मालिकेत दिसणार नाही.
पहा व्हिडिओ
Dasara Melava । शिंदे की ठाकरे गट? यंदा शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार, दोन्ही गटाकडून अर्ज दाखल
परंतु दिलीप जोशी यांच्या निर्णयामुळे चाहते निराश झाले आहेत. खरंतर या मालिकेतील कलाकारांना व्यस्त शेड्युलमधून आपल्या कुटुंबांना फारसा वेळ मिळत नाही. दिलीप जोशी यांनी याबाबत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी “सहकुटुंब सहपरिवार अबू धाबीला भेट देणार,” असे म्हटले आहे.
Export Business । ‘या’ सोप्या पद्धतीने विका परदेशात शेतमाल, परवाना कसा काढावा? जाणून घ्या