![Jio Launches Cheapest Broadband Internet Plan! Learn about…](http://elokhit.com/wp-content/uploads/2023/03/Jio.jpg)
जिओ ही स्वस्तात मस्त डाटा सेवा पुरवणारी आघाडीची नेटवर्क कंपनी म्हणून ओळखली जाते. अगदी कमी काळातच जिओने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. जिओच्या वाढत्या युझर्सच्या संख्येमुळे कितीतरी मोठ्या-मोठ्या नेटवर्क कंपन्यांना आपले बस्तान गुंडाळावे लागले आहे. जिओ चे डाटा प्लॅन्स (Jio data palns) लोकांना आकर्षित करणारे व परवडणारे आहेत. दरम्यान आज आपण जिओच्या काही स्वस्त आणि मस्त प्लॅन्स बद्दल जाणून घेणार आहोत.
रिझर्व्ह बँक ग्राहकांना मोठा झटका देण्याच्या तयारीत!
IPL 2023 डोळ्यासमोर ठेवून रिलायन्स जिओ स्वस्त इंटरनेट प्लॅन ऑफर करत आहे. कंपनीने सोमवारी नवीन ब्रॉडबँड प्लॅनची घोषणा केली. या प्लॅन अंतर्गत, ग्राहकांना फायबर ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन दरमहा केवळ 198 रुपयांमध्ये दिले जाईल. नवीन प्लॅन 30 मार्चपासून सुरू होत आहे. कंपनीने या प्लानला Jio Fiber Backup Plan (Jio Fiber Backup Plan) म्हटले आहे, जे अमर्यादित इंटरनेट ऑफर करते. जिओच्या फायबर बॅकअप प्लॅनची किंमत 198 रुपये प्रति महिना आहे.
बिग ब्रेकिंग! उद्धव ठाकरेंसाठी शरद पवार उतरणार मैदानात
या प्लॅनची 3 प्रमुख वैशिष्ट्ये –
- वापरकर्त्यांना 10 Mbps च्या वेगाने अमर्यादित डेटा दिला जाईल.
- जर वापरकर्ता 10 Mbps च्या स्पीडवर समाधानी नसेल तर तो स्पीड 30 Mbps किंवा 100 Mbps पर्यंत अपग्रेड करू शकतो.
- युजर्सना मोफत लँडलाइन कॉल्सचीही ऑफर देण्यात आली आहे.