जिओ (Jio) ही आघाडीची मोबाईल नेटवर्क कंपनी आहे. आकर्षक ऑफर्स आणि स्वस्तात मस्त नेटवर्क यामुळे जिओचे ग्राहक दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर लाँच केली आहे. या ऑफरमध्ये जिओ युझर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि 5G बेनिफिट्स आणि प्रतिदिन 3GB डेटा मिळत आहे. याशिवाय जिओ सिनेमा, जिओ सावन यांसारख्या सेवा सुद्धा यामध्ये फ्री मिळणार आहेत. हे फायदे असणारे तीन प्लॅन्स सध्या जिओकडे आहेत. जाणून घेऊयात त्याबद्दल..
१) २१९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन – जिओचा हा २१९ रुपयांचा प्लॅन १४ दिवसांसाठी वैध असतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली ३ GB डेटा दिला जातो. याशिवाय रोज १०० SMS या प्लॅनमध्ये मिळतात. महत्त्वाची बाब म्हणजे जिओच्या या प्लॅनमध्ये २GB एक्स्ट्रा डेटा चे व्हाऊचर सुद्धा फ्री मिळते. याची किंमत २५ रुपये इतकी असते.
२)३९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन – जिओचा हा ३९९ रुपयांचा प्लान २८ दिवसांसाठी वैध असतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि ३ GB डेली डेटाची सेवा मिळते. याशिवाय रोज १०० एसएमएस सुद्धा मिळतात. या प्लॅनमध्ये ६१ रुपयांच्या व्हाऊचर सोबत ६ जीबी एक्स्ट्रा डेटा मिळतो.
३) ९९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन – जिओचा ९९९ रुपयांचा प्लॅन ८४ दिवसांसाठी वैध असतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि ३जीबी डेली डेटाही मिळतो. तसेच रोज १०० एसएमएस देखील मिळतात. या प्लॅनमध्ये ४० GB डेटा असणारे व्हाऊचर मोफत मिळते.
लघवीमध्ये ‘हा’ बिघाड म्हणजे हृदयरोगाचे लक्षण! जाणून घ्या सविस्तर…