Jio Upcoming 5G Smartphone । ‘इतक्या’ स्वस्तात लाँच होणार जिओचा 5G फोन, मिळतील भन्नाट फीचर्स

Jio's 5G phone will be launched at 'so' cheap, will get amazing features

Jio Upcoming 5G Smartphone । रिलायन्स जिओ (Reliance Jio) ही देशातील सर्वात आघाडीची टेक कंपनी आहे. अल्पावधीतच कंपनीने आपले स्थान निर्माण केले आहे. कंपनी (Jio) सतत आपले नवनवीन प्रोडक्ट भारतीय बाजारात (Indian market) लाँच करत असते.नुकताच कंपनीने आपला सर्वात स्वस्त लॅपटॉप लाँच केला आहे. अशातच आता कंपनी आपल्या चाहत्यांना आणखी एक भेट देण्याच्या तयारीत आहे. (Latest Marathi News)

Mobile Tips : सावधान! तुटलेल्या स्क्रीनचा स्मार्टफोन वापरणं ठरू शकतं घातक; होईल मोठे नुकसान

स्वस्तात लाँच होणार 5G फोन

कंपनी आता आपला 5G स्मार्टफोन (Jio 5G Smartphone) बाजारात लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीचा आगामी फोन हा एक अल्ट्रा-अफॉर्डेबल फोन असू शकतो. किमतीचा विचार केला तर मीडिया रिपोर्ट्सनुसार याची किंमत 8 ते 10 हजार रुपये (Jio 5G Smartphone Price) असेल.

Kirit Somaiya । किरीट सोमय्या उतरले पुन्हा मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप

मिळतील भन्नाट फीचर्स

जिओच्या आगामी फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या 5G फोनमध्ये 4GB रॅम असेल. शिवाय क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट, स्नॅपड्रॅगन 480+ हा प्रोसेसर वापरकर्त्यांसाठी कंपनी या फोनमध्ये देईल. यात 13MP क्षमतेचा ड्युअल कॅमेरा सेटअप तसेच 8MP क्षमतेचा फ्रंट कॅमेरा असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या फोनमध्ये 5,000 mAh क्षमतेची बॅटरी तुम्हाला पाहायला मिळेल.

Agricultural News । शेतकऱ्याने बनवलेल्या अनोख्या यंत्राची राज्यभर चर्चा! मोटारसायकलचा बनवला चक्क मिनी ट्रॅक्टर

सध्या बाजारात 5G स्मार्टफोनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागणी जास्त असल्याने या फोनच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी जिओचा हा स्मार्टफोन उत्तम पर्याय आहे.

Health News । तुम्ही एकमेकांचे उष्ट अन्न खाताय तर सावधान, उष्ट खाल्ल्याने वाढतायेत आजार; डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Spread the love