जिओने (Jio) पुन्हा एकदा आपला कमी किमतीत येणारा लॅपटॉप (Jio New Laptop) लाँच केला आहे. कमी किंमत आणि जबरदस्त फीचर्समुळे हा लॅपटॉप (Jiobook Price) मार्केटमधील अनेक लोकप्रिय कंपन्यांना टक्कर देईल. जर तुम्ही नवीन लॅपटॉप (Jiobook Laptop) खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. कंपनीच्या या लॅपटॉपची अनेक दिवसांपासून चर्चा होती. (Latest Marathi News)
मोठी बातमी! ऑगस्टमध्ये 14 दिवस बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची यादी
तसेच अनेक दिवसांपासून कंपनी या लॅपटॉपवर काम करत होती. नवीन JioBook लॅपटॉपची किंमत केवळ 16,499 रुपये आहे. तुम्हाला तो 5 ऑगस्टपासून अॅमेझॉनवरून आणि ऑफलाइन रिलायन्स डिजिटलमधून खरेदी करता येणार आहे. स्वस्तात जबरदस्त फीचर्स यात तुम्हाला पाहायला मिळतील.
यात प्रगत Jio OS ऑपरेटिंग सिस्टम दिली आहे. त्याची रचना स्टायलिश आहे. कंपनीने यात अनेक जबरदस्त फीचर्स दिली आहेत. जिओबुक सर्व वयोगटातील लोकांसाठी उपयुक्त असणार आहे. कंपनीने या लॅपटॉपमध्ये 11.6-इंचाचा डिस्प्ले दिला आहे. स्टोरेजचा विचार केला तर या लॅपटॉपमध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आले आहे, जे नंतर तुम्हाला SD कार्डद्वारे 256GB पर्यंत वाढवता येते.
शेतजमिनीवर घर बांधत असाल तर थांबा नाहीतर पाडावे लागले घर; पाहा नियम काय सांगतो
4G लॅपटॉप Jio OS वर काम करतो. तो ड्युअल-बँड वाय-फाय कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करेल. यात शक्तिशाली ऑक्टा-कोअर प्रोसेसरने दिला असल्याने त्यावर मल्टीटास्किंग सहजतेने करता येईल. त्यामुळे स्वस्तात जबरदस्त फीचर्स असणारा लॅपटॉप खरेदी करण्याची संधी सोडू नका.
Success story | शेतकऱ्याचा नादच खुळा! कोथिंबीरतून अवघ्या ४५ दिवसात घेतलं १६ लाखांचं उत्पन्न
हे ही पहा