राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Aavhad) यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. ठाणे महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड व त्यांच्या सात समर्थकांविरोधात नौपाडा पोलिस ठाण्यात (Naupada Police Station) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गोपीचंद पडळकरांचे शरद पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांनी घाण आणि नीच राजकारण…”
जितेंद्र आव्हाड यांची मुलगी व जावयाला जीवे मारण्याची धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप नुकतीच व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये ठाणे महापालिकेचे अधिकारी महेश आहेर यांचा उल्लेख करण्यात आला होता. आव्हाड कुटूंबियांना संपवण्यासाठी तिहार तुरुंगातील गँगस्टर सुभाषसिंह ठाकूर उर्फ बाबाजीला सुपारी देण्यात आल्याचा उल्लेख होता. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा हिने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
‘तारक मेहता..’मधील जेठालालने दयाबेनविषयी अखेर सोडलं मौन म्हणाले…
दरम्यान क्लिप व्हायरल होताच पोलिसांनी महेश आहेर यांना ताब्यात घेतले. यावेळी ठाणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी महेश आहेर ( Mahesh Aaher) यांना मारहाण केली. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आव्हाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
शिंदे व भाजप समर्थकांमध्ये तुफान राडा! पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप