Jitendra Awhad । राज्यात सध्या सुरु असलेल्या सत्तासंघर्षावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आपल्या बारामती मतदारसंघात गेले होते. तेव्हा त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. (Latest marathi news)
त्यांच्या या वक्तव्याचा शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खरपूस समाचार घेतला आहे. (Ajit Pawar vs Jitendra Awhad) “काकाच्या मरण्याची वाट पाहता का? जनता तुम्हाला तुमची औकात दाखवून देईल. अजित पवार यांनी आज हद्द पार केली आहे. एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना कीतपत योग्य आहे. हे माणूसकीला शोभणारे आहे का?असा संतप्त सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
Ganpat Gaikwad Firing । बिग ब्रेकिंग! गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
पुढे आव्हाड म्हणाले की, “आपली उंची ओळखा, कुठे शरद पवार (Sharad Pawar) आणि कुठे तुम्ही? लाज वाटते मला तुमच्यासोबत काम केल्याची अगोदर पण वाटतच होती. शरद पवार देशाचे नेते तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. काकूच्या कपाळावरचं कुंकू पुसायची वाट पाहत आहात. असल घाणेरडे राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिलं नाही’, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.