Jitendra Awhad । ”राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता तो 14 वर्ष वनवास भोगला होता मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असे मोठे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले आहे. सध्या त्यांच्या विधानाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता सर्वच स्तरातून टीका केली जात आहे.
Arvind Kejriwal । मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना अटक होणार?
जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात मोठा संघर्ष उफाळला आहे. आव्हाडांच्या या वक्तव्यनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात थेट जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर निदर्शने देण्यास सुरुवात केली. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार आणि अजित पवार गट एकमेकांच्या विरोधात पहिल्यांदाच आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे.
Iran Explosion News । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! इराण स्फोटाने हादरलं, 105 जणांचा मृत्यू
अजित पवार गटातील कार्यकर्ते जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानाच्या काही अंतरावर रामाची आरती करण्यासाठी आले होते. रामाची आरती करून आव्हाडांचा निषेध नोंदणीसाठी आले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. मात्र पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
माझ्या घरावर आता अजित पवार यांच्या चार समर्थकांनी आरती करण्याचा प्रयत्न केला. मोजून चारच जण होते. श्री रामाचा इतिहास माहित नसलेल्या औलादींना श्री रामाचा इतिहास समजून सांगावा लागेल. श्री रामाने वनवास केवळ एवढ्याचसाठी स्वीकारला होता की , त्यांच्या आईवडिलांमध्ये जे आपापसात ठरले…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 3, 2024