Jitendra Awhad । 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत होणार्या भगवान श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. भाजपने या सोहळ्याची जोरदार तयारी केल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणावरून बड्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे देखील दिसत आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्र यांच्याविषयी मोठे वक्तव्य केले आहे. (Ayodhya Ram Mandir)
” राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता तो 14 वर्ष वनवास भोगला होता मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असे मोठे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले आहे. सध्या त्यांच्या विधानाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.
Sayaji Shinde | मराठा आरक्षणाबद्दल सयाजी शिंदे यांचं सर्वात मोठं वक्तव्य
शिर्डी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे शिबिर आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले, “आपण इतिहास वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. 14 वर्ष जंगलात असणारे राम शिकार करायचे असे देखील आव्हाड म्हणाले आहेत.
Pune Crime । पुणे हादरलं! जन्मदात्या बापाने मुलीवर कुऱ्हाडीने केले वार