Jitendra Awhad । लोकसभा निवडणुकीवरून (Loksabha election) राज्याचे राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. अनेक नेतेमंडळी तिकीट नाकारल्याने पक्षांतर करत आहेत. अशातच चिन्हावरून अजित पवार गट आणि शरद पवार गट आमनेसामने आला आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) इशारा दिला आहे. (Latest marathi news)
Vasant More । वसंत मोरे घेणार मोठा निर्णय, पुणे लोकसभेत मोठा ट्विस्ट
सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) निवडणूक चिन्ह असलेलं घड्याळ लोकसभा निवडणुकीत वापरण्याची परवानगी दिली आहे. या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी सुनिल तटकरे यांच्यावर निशाणा साधत अजित पवारांनाच इशारा दिला आहे. “जर तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरचा अपमान करणार असाल तर तुमच्यावर अवमान याचिका दाखल करावी लागेल. ही केस शरद पवार विरुद्ध अजित पवार (Sharad Pawar Vs Ajit Pawar) आहे. जर अवमान याचिकेत शिक्षा झाली तर जेलमध्ये जावं लागतं, असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी आहे. (Jitendra Awhad Warn Ajit Pawar)
Ajit Pawar । अजित पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य
“सुनिल तटकरे हे फक्त विधान करतील. पण त्यानंतर सगळं अजित पवार यांना सांभाळाव लागणार आहे. कार्यकर्त्याचं मोराल बुस्ट करण्याकरता हे विधान केलं आहे का? माहिती नाही, पण त्यांना सुप्रीम कोर्टाचा मान राखावा लागेल. संविधान वाचवण्यासाठी वंचित आमच्यासोबत येणार आहे. त्यांना कोणता फॉर्म्युला दिला हे मला माहिती नाही, पण वंचितसोबत महाविकास आघाडी होणार आहे,” असेही जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केले आहे.
Politics News । सोलापूरात मोठा ट्विस्ट! राजकारणातून समोर आली सर्वात मोठी बातमी