महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्ये केल्याने पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. यानंतर त्यांनी आणखी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य फक्त महापुरुषांविषयीच नाही तर देवांविषयी पण आहे. एकही देव बॅचलर नाही तसंच एकही महापुरूष बॅचलर नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. पुण्यात राष्ट्रीय युवा दिवसाच्या (Youth Day) निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या युवा संवाद कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. आता यावर जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
“शरद पवारांनी सांगितले तर मी कोरड्या विहिरीत सुद्धा उडी मारेल”; आमदार निलेश लंके यांचे मोठे विधान
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी ट्विट करत लिहिले की, “आपला एकही देव बॅचलर नाही असं चंद्रकांत दादांनी म्हणताच इंद्रलोकात भुवया उंचावल्या व सगळयांनी मारुतीकडे बघायला सुरुवात केली व मारुतीला चंद्रकांत दादांचं म्हणणं ऐकवलं. मारूतीने निर्णय घेतला आहे, कि लवकरच चंद्रकांत दादांची भेट घेऊन ते बॅचलर आहेत कि नाही ह्यावर सविस्तर चर्चा करणार.”
त्याचबरोबर आव्हाड पुढे म्हणाले की, “संसार करून पण सगळं करता येतं असं महापुरुष व देवांना उद्देशून चंद्रकांत दादांनी म्हटलं आहे. त्यावर आता रामदास स्वामी काय उत्तर देतात ह्यावर आता सगळ्यांच्या नजारा लागल्या आहेत.” असे दोन ट्विट आव्हाड यांनी केले आहेत.
आपला एकही देव बॅचलर नाही असं चंद्रकांत दादांनी म्हणताच इंद्रलोकात भुवया उंचावल्या व सगळयांनी मारुतीकडे बघायला सुरुवात केली व मारुतीला चंद्रकांत दादांचं म्हणणं ऐकवलं. मारूतीने निर्णय घेतला आहे, कि लवकरच चंद्रकांत दादांची भेट घेऊन ते बॅचलर आहेत कि नाही ह्यावर सविस्तर चर्चा करणार.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 13, 2023
मजुरी करणाऱ्या कुटुंबाला वीजबिलाचा आकडा पाहून बसला शॉक; घरात दोनच बल्ब पण 34 हजारचे आले बिल