Site icon e लोकहित | Marathi News

“जोड्याने मारल पाहिजे याला..!”, बागेश्वर बाबांच्या संत तुकाराम महाराजांबद्दलच्या आक्षेपार्ह विधानावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

Jitendra Awha's reaction to Bageshwar Baba's objectionable statement about Sant Tukaram Maharaj, "Such copycat Babane..."

संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची असे वक्तव्य बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांनी केले आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बागेश्वर बाबा यांच्या या विधानामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माकड जोमात पाहणारे कोमात! माकडाने उडवला पतंग; पाहा VIDEO

भाजपच्या अध्यात्मिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसने देखील यांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. यामध्येच आता त्यांच्या या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awad) एक ट्विट केले आहे.

मित्राचा वाढदिवस चांगलाच भोवला, करायला गेला एक अन् झालं एक; पाहा VIDEO

ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी लिहिले की, “या असल्या नकलाकार बाबांनी आमच्या महापुरुषांच्या बाबतीत तोडलेले अकलेचे तारे बघितल्यावर तुकोबारायांच्या शब्दातच सांगायचं म्हटल तर, “तुका म्‍हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा”ही उक्ती योग्यच वाटते. अन व्यावहारिक भाषेत बोलायचं म्हटल तर, “जोड्याने मारल पाहिजे याला..!”यावरच समाधान होत.”

Spread the love
Exit mobile version