Site icon e लोकहित | Marathi News

‘त्या’ अटक झालेल्या रॅपरसाठी जितेंद्र आव्हाड उठवणार आवाज; केली मोठी घोषणा

Jitendra will raise his voice for 'that' arrested rapper; Made a big announcement

राज मुंगासे या रॅपरने एक गाणं तयार केलं होतं. या गाण्यामध्ये ५० खोके आणि चोर अशा शब्दांचा उल्लेख करण्यात आला होता. यांनतर याची सगळीकडे जोरदार चर्चा होती. या तरुणाविरोधात अंबरनाथमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र आता या तरुणाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. आता प्रकरणी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) चांगलेच संतापले असून त्यांनी मोठी घोषणा केली आहे.

सर्वात मोठी बातमी! येत्या 3-4 तासांत ‘या’ भागात पडणार पाऊस

रॅपरला अटक केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड संतापले असून सरकार लोकांची मुस्काटदाबी करत असल्याचा आरोप त्यांनी केला यावेळी आहे. मात्र आता त्यांनी एक मोठी घोषणा केली असून रॅपरवर झालेल्या कारवाई विरोधात ते आवाज उठवणार आहेत. मी सगळ्या रॅपर्सना एकत्र करुन ठाण्यात कार्यक्रम घेणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटल आहे.

अयोध्या दौऱ्यावरून अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले, “मला देखील जायचं आहे पण…”

रोहित पवारांनीही व्यक्त केला संताप –

रोहित पवार ट्विट करत म्हणाले, “आपल्या रॅपसाँग मध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख नसतानाही राम मुंगासे या तरुण कलाकाराला ५० खोके या शब्दामुळं अटक होत असेल तर हा सरकारचा कबुलीजबाबच नाही का? शिव्याचं कुणीही समर्थन करत नाही, पण राज्यातील खुद्द एका मंत्र्यानेच महिला लोकप्रतिनिधीला अर्वाच्च शिविगाळ केली तेंव्हा कारवाई करण्याऐवजी सरकारने कानात बोटं घातली आणि डोळे बंद केले. ब्रिटीश राजवटीची आठवण करुन देणारा हा धोकादायक कारभार आहे.

शरद पवार यांना मोठा धक्का! अतिशय जवळच्या विश्वासू सहकाऱ्यावर गुन्हा दाखल

Spread the love
Exit mobile version