राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार ( Sharad Pawar) काल पर्वती येथे कार्यक्रमासाठी उपस्थित होते. शाहू कॉलेजच्या आवारातील अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयाच्या संकुलात विविध उपक्रमांच्या अनावरण सोहळ्यास शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डीएसटी प्रयास शाळा,रोबोटिक्स प्रयोगशाळेचे उद्घाटन व हेरीटेज क्लबच्या लोगोचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. ‘देशातील 80 टक्के तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील’ असे वक्तव्य या कार्यक्रमादरम्यान शरद पवारांनी केले आहे.
कुस्तीसम्राट अस्लम काझी यांनी सिकंदरला दिला मोठा सल्ला; म्हणाले…
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, एस एम ई चेंबर ऑफ इंडिया व सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात शरद पवारांनी तरुणाईला मार्गदर्शन केले. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस नवीन शोध व संशोधन होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभे राहाण्याची संधी मिळाली आहे.
‘या’ चित्रपटासाठी कंगना रनौतने गहाण ठेवली मालमत्ता; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
याचा फायदा तरुण पिढीने घ्यायला हवा. परंतु, तरुणांनी यासाठी जगात कोठेही नोकरीस जाण्याची तयारी ठेवणे गरजेची आहे, असे शरद पवार यावेळी म्हणाले आहेत. तसेच नवीन पिढीला तयार करताना तंत्रज्ञानाची ( Technology) जोड असणे आवश्यक आहे. येत्या काळात स्टार्ट अप व अन्य योजनांमुळे 80 टक्के तरुणांना नोकऱ्या ( Employment) मिळणार आहेत. दरम्यान संशोधन आणि तंत्रज्ञानामुळे देशाचे उत्पादन वाढले जाईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
धक्कादायक! तरुणाने विवाहितेवर केला बलात्कार वरून म्हणाला की, आमचे हेच काम आहे…