Johny Lever Birthday । बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते जॉनी लिव्हर (Johny Lever) यांनी आपल्या करिअरची सुरुवात स्टँडअप कॉमेडियन म्हणून केली. त्यांचे मुळ नाव जॉनी प्रकाश (Johnny Prakash) असे आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांनी १९९२ पासून ते २००० पर्यंत प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु काही काळापासून त्यांनी ब्रेक घेतला आहे. (Latest Marathi News)
आज ते आपल्या कुटुंबासोबत रॉयल जीवन जगत आहेत. परंतु एक काळ असा होता, जेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबाची भूक भागवण्यासाठी अनेक वाईट परिस्थितीचा सामना केला होता. वाईट परिस्थितीवर मात करत त्यांनी बॉलिवूडमध्ये (Bollywood) स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल सांगितले आहे. (Johny Lever Happy Birthday)
Agricultural News । अर्रर्र! बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका
जॉनी लिव्हर यांचा जन्म १४ ऑगस्ट १९५७ साली मुंबईतील चाळीत झाला. त्यांच्या वडिलांना व्यसन होते त्यामुळे ते शाळेतून घरी आल्यानंतर वाढदिवसांच्या पार्टीत काम करायचे. त्यांच्या घरात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आणि शाळेची फी त्यांचे काका भरत होते. त्यांनी आर्थिक परिस्थितीला कंटाळून सातवीनंतर शाळा सोडली. कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी यासाठी त्यांनी पेन विकायला सुरुवात केली. त्यातून त्यांना दिवसाला पाच रुपये मिळायचे.
Smartphone Tips । तुमचाही फोन सतत हँग होतोय का? तर ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो
दिवसा पेन विकून ते हिंदुस्थान लीव्हर कंपनीत नोकरी करत असल्याने त्यांचे लिव्हर असे नाव पडले. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी जीव देण्याचा प्रयत्न केला. प्लॅटफॉर्मवर झोपून त्यांनी ट्रेन येण्याची वाट पाहिली. परंतु, त्यांना नशिबाने साथ दिली आणि विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळाली.
Onion Price । शेतकऱ्यांना मोठा धक्का! कांद्याचे दर रोखण्यासाठी सरकारने घेतला निर्णय