“फक्त बारामतीकरांच्या विरोधात भुंकण्यासाठीच…”, विद्या चव्हाण यांची गोपीचंद पडळकरांवर जोरदार टीका

"Just to bark against Baramatikars...", Vidya Chavan slams Gopichand Padalkar

राज्याच्या राजकारणामध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप चालूच आहेत. यामध्येच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

गाडी दमान घ्या बारामतीकरांनो! वेग वाढला की 2000 दंड झालाच समजा; प्रशासनाने घेतलाय ‘हा’ मोठा निर्णय

मंगळसूत्र चोरणारे आमदार झालेत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी पडळकरांवर जहरी टीका केली आहे. पाडळकरांना स्वतःचं डोके आहे का? चोऱयामाऱया करून ते आमदार झाले आहेत. फक्त बारामतीकरांच्या विरोधात भुंकण्यासाठीच त्यांना आमदारकी दिली आहे, अशा शब्दांमध्ये विद्या चव्हाण आणि टीका केली आहे.

मोठी बातमी! प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालचा अपघात

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण या पंढरपुरात एका खासगी कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे.

ब्रेकिंग! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये सोन्याची खाण; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *