औरंगाबाद : औरंगाबादमधून मागच्या काही दिवसांपूर्वी यूट्यूबर ‘बिंदास काव्या’ (Bindas Kavya) बेपत्ता झाली होती. तिच्या अचानक गायब होण्याने समाजमाध्यमांवर ती चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर तिच्या पालकांनी पोलीस तक्रार केली आणि नंतर काव्या मध्य प्रदेशच्या इटारसी स्टेशनवर सापडली होती. पण आता या प्रकरणाबाबत एक मोठी माहिती समोर आलीये.
मोठी बातमी! राज्यातील शिवभोजन थाळी योजना बंद होण्याची शक्यता
बिंदास काव्या बेपत्ता झाली नसून हे सर्व तिच्या कुटुंबीयांनी ठरवून केलं होत. त्यांनी फक्त फॅन फॉलोअर्स (Followers) वाढवण्यासाठी काव्या बेवत्ता असल्याचे भासवले असल्याची समोर आले आहे. एका शुल्लक कारणावरून घरच्यांवर नाराज होऊन काव्या निघून गेली होती असे कारण तिच्या घरच्यांनी काव्या घरी परतल्यावर दिले. पण तो सगळा बनाव होता.
बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष अॅड. आशा शेरखाने-कटके यांनी माहिती देताना सांगितले की, “ही सर्व घटना पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रसिद्धीसाठी यंत्रणेस वेठीस धरणे योग्य नसल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हणाल्या”. या कृतीने फक्त फॅन फॉलोअर्स वाढवून पैसे मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणे कितपत योग्य आहे, असा सवाल देखील सगळीकडे उपस्थित केला जातोय.
कांद्यामुळे नाफेडला बसला मोठा फटका, ‘या’ जिल्ह्यातील कांदा सडला