Beed Loksabha । बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग, ज्योती मेटेंनी लोकसभेपूर्वी घेतला मोठा निर्णय

Beed Loksabha

Beed Loksabha । बीड : सर्व राजकीय पक्ष आपापल्या मतदारांची यादी जाहीर करत आहेत, अनेक राजकीय नेते तिकीट न मिळाल्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. (Loksabha election) नुकतीच शरद पवार गटाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात बीडमध्ये बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांना उमेदवारी दिली आहे. पण बीडमध्ये गणित बदलण्याची शक्यता आहे. (Loksabha election 2024)

Sharad Pawar । बिग ब्रेकिंग! शरद पवारांनी जाहीर केली दुसरी यादी; पाहा कोणत्या नेत्यांना मिळाली संधी

बीडमध्ये शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख ज्योती मेटे (Jyoti Mete) यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. पण अचानक त्यांचं तिकीट कापले आहे. अशातच आता ज्योती मेटे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्योती मेटे अपक्ष उमेदवारी लढण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भात लवकरच त्या कार्यकर्त्यांशी भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Ajit Pawar । भाजपला मोठा धक्का, भाजप आमदाराच्या पत्नीने अजित पवारांच्या पक्षात केला प्रवेश

दरम्यान, महाविकास आघाडीकडून ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा होती. त्यासंदर्भात शरद पवार यांच्यासोबत बैठकाही झाल्या होत्या. ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढावी ही लोकांची आणि शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अशातच जर ज्योती मेटे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर त्याचा परिणाम आगामी निवडणुकीवर होऊ शकतो.

Crime News । धक्कादायक! विवाहितेवर अत्याचार करून नदीच्या वाळूत पुरला मृतदेह

Spread the love