श्रीगोंदा : हिरडगाव येथे प्रा.स्व.तुकाराम नाना दरकेर यांच्या स्मरणार्थ काल २८ ऑक्टोबर २०२२ रोजी एकदिवशीय भव्य कबड्डी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेसाठी अनेक भागातून खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बिग ब्रेकिंग! ‘या’ तणनाशकावर बंदी; शेतकरी झाले नाराज.. नेमकं काय आहे कारण?
कबड्डी स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून पारनेरचे आमदार माननीय श्री.निलेश लंके उपस्थित होते व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पेडगाव सोसायटीचे चेअरमन श्री.रोहिदास किसन पवार हे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर हिरडगावमधील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ देखील उपस्थित होते.
धक्कादायक! कुळधरणमध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
कबड्डी सामना मोठ्या उत्साहात पार पडला. हा सामना रात्री दीड वाजता संपला. यामध्ये पहिले बक्षिस राकेश भैया घुले (पुणे ) या संघाने पटकावले, दुसरे बक्षीस भूमिपुत्र संघ. (मलोरी. कोल्हापूर) , तिसरे बक्षीस शिवभक्त संघ (चांडगाव) या संघाने पटकावले आहे. आणि शेवटी चतुर्थ बक्षीस आलेगाव संघाने पटकावले आहे.
Tomato: टोमॅटोचे दर भिडणार गगनाला: पाहा सध्या काय आहेत दर?
दरम्यान, प्रथम बक्षीस २१०००, द्वितीय बक्षीस १५०००, तृतीय बक्षीस ९०००, चतुर्थ बक्षीस ५००० अशा प्रकारे बक्षीस वितरण करण्यात आले आहे.
मोठी बातमी! आता भूमिहीनांना मिळणार जमीन; वाचा सविस्तर माहिती