Shrikant Shinde। राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election) पार पडणार आहेत. एकीकडे राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत तर दुसरीकडे तिकीट नाकारल्याने काही नेते पक्षांतर करत आहेत. महायुती कल्याण लोकसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी देणार? याकडे सर्वांचे लागले होते. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी दिली आहे. यामुळे आता कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर राणे (Vaishali Rane) आणि महायुतीचे श्रीकांत शिंदे यांच्यात लढत पार पडणार आहे. (Vaishali Rane vs Shrikant Shinde) अटीतटीच्या लढतीत कोणाचा विजय होईल, हे येत्या काळात स्पष्ट होईल.
दरम्यान, शुक्रवारी कल्याण पूर्वमध्ये भाजपची बैठक पार पडली होती. बैठकीदरम्यान श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिल्यान भाजप कार्यकर्त्यांना चपराक बसला आहे. महायुतीचा उमेदवार कल्याणमधून निवडून येणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.