Kamal Nath News Live । सध्या निवडणुकांच्या पार्शवभूमीवर अनेक बडे नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. काँग्रेला देखील निवडणुकांच्या पार्शवभूमीवर चांगलीच गळती लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा कधीही जाहीर केल्या जाऊ शकतात. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू असून बड्या नेत्यांनी एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. सध्या काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ त्यांचा मुलगा नकुल नाथ यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. इतकेच नाही तर त्यांच्यासोबत अनेक आमदार रविवारी (१८ फेब्रुवारी) काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
Manisha Kadane । धक्कादायक बातमी! लेखी परीक्षा पास फक्त ग्राऊंड राहिलेलं, पण घडलं वेगळंच…
या सर्व चर्चा सुरु असतानाच कमलनाथ दिल्लीत पोहोचले आहेत आणि म्हणाले, “सध्या असे काही नाही. जेव्हा ते होईल तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू.” कमलनाथ यांना पक्षात समाविष्ट करून भाजपला काय फायदा होणार आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जर कमलनाथ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर काँग्रेला मोठा झटका बसणार आहे.
Eknath Shinde । ब्रेकिंग! एकनाथ शिंदेंनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट