युट्युब हे आजच्या काळात मनोरंजनाचे मोठे माध्यम बनले आहे. यावर अनेक प्रकारचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. युट्युब शॉट्स ( Youtube Shots) हा प्रकार देखील आजकाल चांगलाच चालतोय. अनेक कंटेंट क्रिएटर्स या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करत आहेत. यातून त्यांना आर्थिक फायदा व प्रसिद्धी मिळते. यूट्यूबने नुकतीच 2022 मधील भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अशा शॉर्ट्स व्हिडीओंची यादी प्रसिध्द केली आहे. यामध्ये कामवाली बाईच्या ‘बारिश में भीगना’ ( Barish mein Bheegna) या व्हिडीओला पहिल्या क्रमांकाची पसंती मिळाली आहे.
10 मिनिटांत घरी बसल्या बनवा पॅनकार्ड; ऑनलाइन पॅनकार्ड तयार करण्याची सोपी पद्धत
युट्युबच्या 2022 च्या टॉप क्रिएटर्सच्या ( Top Creators 2022) यादीत कामवाली बाई हे कॅरेक्टर असलेले शॉर्ट ब्रेक्स चॅनेल पहिल्या क्रमांकावर आहे. यामधील अपर्णा तांदळेचा ‘बारीश में भीगना’ हा व्हिडीओ चक्क 30 कोटी लोकांनी पाहिला आहे. ही अपर्णा तांदळे म्हणजे इन्स्टाग्राम, फेसबुक वरील शीला दिदी होय. अपर्णा तांदळे ही पुणे येथील हडपसर मधील असून तिचे मित्र सायली सोनुले आणि प्रशांत कुलकर्णी यांच्या सोबत वेगवेगळे मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
बिग ब्रेकिंग! राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
अवघ्या 22 वर्षाच्या अपर्णा तांदळेला तिच्या कलेच्या जोरावर एवढ्या लहान वयात प्रसिद्धी मिळाली आहे. लहानपणापासून अभिनयाची आवड असणारी अपर्णा कॉलेजमध्ये असल्यापासून नाटकामध्ये काम करत आहे. अभिनेत्री व्हायचे म्हणून तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. मध्यंतरी तिने शॉर्ट्स ब्रेक या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ‘कामवाली बाई’ शीला दीदीचे व्हिडीओ बनवायला सुरू केले. सामान्य लोकांच्या जीवनावर आधारित असणारे हे व्हिडीओ लोकांना आपले वाटतात. शिवाय ते मजेशीर देखील असतात. यामुळे ते सध्या युट्युबवर धुमाकूळ घालत आहेत.
रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधोमध अडकली मुलगी, आरपीएफ जवानांनी वाचविले प्राण; पाहा VIDEO