Kangana Ranaut Assets । मंडी लोकसभा मतदारसंघातून (Mandi Lok Sabha Constituency) भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणारी बॉलिवूड क्वीन कंगना रनौत कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची मालक आहे. नामांकनादरम्यान दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, कंगनाकडे कोट्यवधी रुपयांची सोने-चांदी आहे. तीच्याकडे अनेक आलिशान गाड्याही आहेत. अभिनेत्री कंगना राणौत हिच्याकडे एकूण 90 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता आहे.
कंगनाकडे 8.55 कोटी रुपयांचे सोने, चांदी आणि हिरे आहेत. 5.50 कोटींच्या आलिशान गाड्या आहेत. 5 कोटी रुपयांचे 6.70 किलो सोने, 55 लाख रुपयांचे 60 किलो चांदी आणि 3 कोटी रुपयांचे 14 कॅरेटचे हिरे आहेत. तीच्याकडे 53,827 रुपयांची 2013 मॉडेलची Vespa स्कूटर आहे. 98.25 लाख रुपयांची बीएमडब्ल्यू कार, 58.65 लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ कार आणि 3.91 कोटी रुपयांची मर्सिडीज मायबा कार आहे. ही कार मणिकर्णिका फिल्म्सच्या नावावर नोंदणीकृत आहे.
कंगनाने पंजाबमधील जिरकपूरमध्ये चार प्लॉट खरेदी केले आहेत. त्याची किंमत 2.46 कोटी आहे. मुंबईतील पाली हिल्समधील घराची किंमत 21.74 कोटी रुपये आहे आणि मनालीमधील घराची बाजारातील किंमत 2.5 कोटी रुपये आहे. एकूण स्थावर मालमत्ता 62.92 कोटी रुपये आहे.
Rakhi Sawant । ब्रेकिंग! अभिनेत्री राखी सावंतची प्रकृती खालावली; रुग्णालयामध्ये उपचार सुरु