मागील काही महिन्यांपासून शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? यावरून शिंदे व ठाकरे गटात वाद सुरू होते. दरम्यान निवडणूक आयोगाने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून शिवसेना ( Shivsena) पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. आता यावर अभिनेत्री कंगना रणौतने देखील अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया दिली आहे.
मोठी बातमी! ‘मिर्झापुर’ फेम शाहनवाज प्रधान यांचे निधन
कंगना रणौत (Kangana Ranaut) ट्विट करत म्हणाली, “देवांचा राजा इंद्र सुद्धा दुष्कृत्ये करून स्वर्गातून पडतो, तो फक्त एक नेता आहे, जेव्हा त्याने माझे घर अन्यायाने तोडले तेव्हा मला समजले, तो लवकरच पडेल, देव चांगल्या कर्मांनी पुन्हा वर जाऊ शकतात परंतु जो स्त्रीचा अपमान करतो तो पुन्हा वर जाऊ शकत नाही.”
कुकर्म करने से तो देवताओं के राजा इन्द्र भी स्वर्ग से गिर जाया करते हैं, वो तो सिर्फ़ एक नेता है, जब उसने अन्याय पूर्व मेरा घर तोड़ा था, मैं समझ गई थी, ये शीघ्र ही गिरेगा, देवता अच्छे कर्मों से उठ सकते हैं लेकिन स्त्री का अपमान करने वाले नीच मनुष्य नहीं… ये अब कभी उठ नहीं पाएगा।
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 17, 2023
ठाकरेंना अजून एक मोठा धक्का! ठाकरे गटाच्या खासदाराने दिले शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र
अशा पद्धतीने कंगनाने उद्धव ठाकरेंचा उल्लेख न करता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. कंगनाचे हे ट्विट सध्या खूप चर्चेत आहे. अनेकजण यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.