मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा आज ७२वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेगेवेगळ्या क्षेत्रातील लोक शुभेच्छा देत आहेत. यामध्ये कलाकार मंडळी देखील मोदींवर शुभेच्छांचं वर्षाव करत आहे. अजय देवगण, विवेक अग्निहोत्रीसारख्या बॉलिवूडच्या कलाकारांनीसुद्धा नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. आता यामध्येच अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) देखील खास पद्धतीने पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
मोदींना शुभेच्छा देत कंगना म्हणाली की, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. रेल्वेस्टेशनवर चहा विकणारा मुलगा ते जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्त्व हा तुमचा प्रवास अविश्वसनीय असा आहे. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. प्रभूश्रीराम, श्रीकृष्ण, आणि गांधीजींप्रमाणे तुम्ही अमर आहात. तुमचा राजकीय वारसा कुणीही मिटवू शकणार नाही, म्हणूनच मी तुम्हाला एक ‘अवतार’ मानते. तुमच्यासारखा नेता आम्हाला लाभला हे आमचे भाग्य आहे.” असे बोलत कंगनाने मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
Cheetah Is Back: तब्बल 70 वर्षांनंतर नामिबियातून भारतात आले आठ विदेशी चित्ते
या शुभेच्छा देताना कंगनाने मोदी सर्वात पावरफुल असल्याचा उल्लेख केला आहे. कंगनाच्या या कॉमेंटमुळे तिला मोठ्या ट्रोलही केलं जातय. बऱ्याचवेळा मोदी सरकारच्या समर्थनार्थ वक्तव्य देणाऱ्या कंगनाला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. तरी ती कायम निर्भीडपणे तिची राजकीय बाजू मांडत असते.