बाॅलिवूडची क्विन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रनौत (Kangana Ranaut). कंगना नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असते. महाराष्ट्रातील राजकारण (politics) सध्या चांगलंच ढवळून निघाले आहे. नुकताच निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय देऊन उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का दिला आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना रनौतने भाष्य केला आहे.
निळू फुले यांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर; प्रसाद ओक करणार बायोपिकचं
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. या निकालानंतर ठाकरे गटामध्ये नाराजी पसरली असून ठाकरेंची समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या दरम्यान कंगना रनौतने सोशल मीडियावर नेटकरांच्या प्रश्नांना उत्तर देत ठाकरे गटाला टार्गेट केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितला पुढचा प्लॅन; म्हणाले, “मशाल हे चिन्हं
कंगना म्हणाली की, इतरांचे नशिब पाहून एखाद्याला कधीही दोषी वाटू नये, नीच, दयनीय लोकांना असे वाटते, मी तशी व्यक्ती नाही. त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळत आहेत. माझ्या भावना बाजूला मी गोष्टींचे निरीक्षण आणि चिंतन करते. यावेळी युजरने कंगनाला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची अवस्था बघून कसं वाटत आहे? असा प्रश्न विचारला होता.
दरम्यान, कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कंगना रनौत यांच्यातील वाद चांगलाच धुमाकूळ घालत होता. तर संजय राऊत यांनी देखील कंगनावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. यावेळी कंगनाने ठाकरे सरकारला ‘आज मेरा घर टूट है कल तेरी घमंडी टूटेगा’, असं उत्तर दिलं होतं.