Site icon e लोकहित | Marathi News

Kangana Ranaut । कंगनाची होणार राजकारणात एन्ट्री? म्हणाली; “आगामी निवडणुकीत भगवा रंग…”

Kangana's entry into politics? said; "The color saffron in the upcoming elections..."

Kangana Ranaut । बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कंगना रनौत सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत येते. बऱ्याचवेळा तर ती वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत येते. ती या विधानांमुळे (Kangana Ranaut Statement) ट्रोलही होते. परंतु ती त्याकडे लक्ष देत नाही. ‘क्वीन’, ‘मणिकर्णिका’ अशा अनेक चित्रपटांमध्ये कंगनाने काम केले आहे. लवकरच तिचा ‘चंद्रमुखी 2’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Latest Marathi News)

Fire Accident । हृदयद्रावक! लग्न समारंभात लागलेल्या आगीमध्ये १०० जणांचा मृत्यू तर १५० जण जखमी

सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. लवकरच कंगनाची राजकारणात एन्ट्री होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे. “मी एक जागरुक आणि जबाबदार व्यक्ती असून मी राजकारणात येण्यासाठी माझी मतं मांडते किंवा काहीतरी वक्तव्य करते, असा अनेकांचा गैरसमज आहे. परंतु हे खोटं आहे. आगामी निवडणुकीत (2024 Election) मला भगवा रंग पाहण्याची माझी इच्छा आहे,” असे कंगना म्हणाली.

Shivsena MLA Disqualification Case । बिग ब्रेकिंग! ‘या’ दिवशी होणार आमदार अपात्रता प्रकरणाची अंतिम सुनावणी

कंगना पुढे असे म्हणाली की,”मला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Naredra Modi) यांना भेटण्याची संधी मिळाली. दोन-तीन वर्षांपूर्वी मी त्यांना भेटले होते,आता पुन्हा हा योग आला आहे. मोदी सरकार आल्यापासून देशाची प्रगती होत आहे, ही खूप आनंदाची बाब आहे. देशात सकारात्मक बदल होत आहेत,” असेही कंगना म्हणाली.

Crime News । नकार जिव्हारी लागला! रागाच्या भरात गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडच्या प्रायव्हेट पार्टवर…

Spread the love
Exit mobile version