मुंबई : ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला असून 30 ऑक्टोबरल प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट (Movie) मूळ तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात सैफ अली खानसोबत (Saif Ali Khan) हृतिक रोशन दिसणार आहे. तर चित्रपटात अभिनेत्री राधिका आपटे(Radhika Apte) ही सैफ अली खानच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून भूषण कुमार आणि एस.शशिकांत यांनी केले आहे.
हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कलाकारांनी चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे. दरम्यान या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही राधिका आपली छाप सोडताना दिसत आहे. अलीकडेच कपिल शर्माच्या शोमध्ये या चित्रपटाचे काही कलाकार प्रमोशनसाठी पोहोचले होते. दरम्यान शोचा होस्ट कपिल शर्माने (Kapil Sharma) आपला कॉमेडियन मोर्चा राधिका आपटेकडे वळवला..
काय म्हणाला कपिल शर्मा
यावेळी कपिलने राधिकाकडे पाहिलं आणि म्हणाला, ‘अलीकडेच जेव्हा नेटफ्लिक्स भारतात आलं, तेव्हा मी तुझं इतकं पाहिलं की नंतर मला वाटलं की नेटफ्लिक्सचा लोगो तुझा चेहरा आहे. इतकं काम करून सुद्धा तुला सबस्क्राईब करावंच लागेल’? यावर शो मध्ये जोरदार हशा पिकला. पुढे राधिका कपिलला म्हणाली की , “नाही मलाही 600 रुपये द्यावे लागतील” मग काय हे ऐकून उपस्थितांमध्ये पुन्हा हशा पिकला. नंतर या शोमध्ये कपिलने सैफ आणि राधिकाला आठवण करून दिली की या दोघांनी यापूर्वी ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमध्ये एकत्र काम केले होते.
Amol Mitkari: “…तर शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळणार” , राष्ट्रवादीचे अमोल मिटकरींचे भाकीत चर्चेत