मुंबई : करण कुंद्रा (Karan Kundra) आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. दोघे बिग बॉस 15 मध्ये भेटले होते आणि तेव्हापासून ते एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही अनेकदा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. आता सध्या करण कुंद्रा आणि तेजस्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघे एकमेकांना किस करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये, करण आणि तेजस्वी वेगवेगळ्या एस्केलेटरवर उभे असल्याचे दिसत आहे. एक वर जात आहे, दुसरा खाली येत आहे आणि मध्येच दोघे एकमेकांना क्रॉस करून किस घेतात. तेजस्वी ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे, तर करणने ब्लेझर घातलेला आहे. दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चाहते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, दोघांचे सुंदर हास्य पाहा, तर दुसऱ्याने लिहिले की, सर्वात क्यूट कपल. त्याचवेळी एकाने लिहिले की, तेजस्वीला पाहून करण ज्या प्रकारे लाजतो, तो खूपच क्यूट दिसत आहे.
Tanaji sawant: तानाजी सावंत ऍक्शन मोडमध्ये, ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर व्यक्त केली नाराजगी