अनुष्का शर्मा ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनुष्का शर्माने २००९ साली आदित्य चोप्राच्या रब ने बना दी जोडी या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. परंतु अनुष्का शर्मा विषयी करण जोहरने असे काही वक्तव्य केले आहे की अनुष्का शर्माच करिअर उद्ध्वस्त करायचं होतं. या विधानाने सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.
जीवे मारण्याच्या धमक्यांबाबत सलमान खानने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “…तर काही लोकांचा”
सुई धागा, ये दिल हे मुश्किल, रब ने बनादी जोडी यासारख्या अनेक चित्रपटामध्ये अनुष्काने काम केले आहे. आदित्य चोप्राने करण जोहरचं ऐकलं असतं तर अनुष्काचं करिअर उद्ध्वस्त झालं असतं. असा खुलासा एका मुलाखतीमध्ये करण जौहरने स्वतः केला आहे. २०१६ च्या १८ व्या मामी फेस्टिव्हलमध्ये करण जोहरने याबद्दल कबुली दिली होती. याचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बिग ब्रेकिंग! प्रसिद्ध नाटककार जयंत पवार यांचे निधन
अनुष्काला चित्रपटामध्ये काम करायला घेऊ नको असे करणने त्याचा मित्र अदित्यला वारंवार सांगतले होते. रब ने बना दी जोडी’मध्ये आदित्य चोप्रानने अनुष्काऐवजी सोनम कपूरला घ्यावं अशी करणची इच्छा होती. पण त्यावेळी आदित्य चोप्राने करण जोहरचा न ऐकता अनुष्कालाच सिनेमात घेतलं.