
करण कुंद्रा (Karan Kundra) आणि तेजस्वी प्रकाश (Tejasvi Prakash) हे सध्या छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. चाहते या जोडीला खूप प्रेम देतात. त्यांना एकत्र पाहण्यास चाहते कायम उत्सुक असतात. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात.
बैलगाडा शर्यतीला गालबोट! युवकाच्या पोटात बैलानी खूपसले शिंग; तरुणाचा जागीच मृत्यू
दरम्यान, आता देखील करण कुंद्रा (Karan Kundra) आणि तेजस्वी प्रकाश यांचा एक खासगी व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो खासगी व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.
‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इंस्टाग्राम पेजवर या दोघांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोघेही पार्टी करताना दिसत आहेत, तसेच दोघेही एकमेकांच्या खूप जवळ डान्स करताना दिसत आहेत. त्यांची डान्स करण्याची पद्धत पाहून नेटकरी संतापले आहेत. या व्हिडिओवर संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत. ‘याला रोमँटिक डान्स म्हणत नाहीत, तर अश्लीलता म्हणतात,’ अशा कमेंट युजर करत आहेत.