Karan Johar । प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर सतत वेगवेगळ्या मुद्द्यावरून परखड मत मांडत असतो. सध्या अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) ‘गदर 2’ (Gadar 2) बॉक्स ऑफिसवर (Box office) चांगलाच धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने 10 दिवसातच 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. हे यश पाहता करण जोहरने सुद्धा त्याचे कौतुक केले आहे. मी सिंगल स्क्रीन्ससाठी खूप खूश आहे, असे मत करणने व्यक्त केले आहे. (Latest Marathi News)
Kisan Drone Subsidy । ड्रोन खरेदीसाठी सरकारकडून मिळतेय 5 लाखांची मदत, असा करा अर्ज
नुकत्याच एका मुलाखतीत करण जोहरने बायोपिक्सविषयी भाष्य केले. बायोपिक्ससाठी त्याने काही कलाकारांची नावेदेखील सुचवली. त्यामध्ये त्याने अमिताभ बच्चन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंकज त्रिपाठी यांनी सुकेश चंद्रशेखर, ऐश्वर्या रायने नीता अंबानी, रणबीर कपूरने राहुल गांधी आणि विकी कौशलने विराट कोहलीची भूमिका साकारावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
Dhanajay Munde । कांदा प्रश्नावरून तोडगा निघणार? धनंजय मुंडे घेणार पियुष गोयल यांची भेट
तसेच त्याने बॉक्स ऑफिसच्या कमाईमागचं (Box office earnings) सत्य सांगितले आहे. बोलताना तो म्हणाला की, “बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी छेडछाड होत आहे. आम्ही सगळे खोटारडे आहोत. बॉलिवूड सेलिब्रिटी हे त्यांच्या रिव्ह्यूबद्दल प्रामाणिक नसतात,” असा खुलासा करणने केला आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Sharad Pawar । शरद पवारांची आंबेगावमध्ये धडाडणार तोफ, ‘त्या’ वक्तव्याचा घेणार समाचार?