Site icon e लोकहित | Marathi News

Karjat : कर्जतमधील नूपुर शर्मा हल्ल्याप्रकरणी १४ जणांना अटक! वाचा सविस्तर

Karjat: 14 people arrested in the case of Nupur Sharma attack in Karjat! Read in detail

कर्जत : अहमदनगरच्या कर्जत (Karjat) शहरात प्रतिक पवार या युवकावर गुरुवारी रात्री एका गटाने हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये प्रतिक गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रतिकवर हल्ला झाल्यानंतर कर्जतमध्ये सामाजिक वातावरण चांगलंच तापलं. हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी एकूण १४ जणांना अटक केली आहे. दरम्यान या घटनेसंदर्भात केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या पथकानेही माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

माहितीनुसार, फिर्यादीने ‘आय सपोर्ट नूपुर शर्मा’ असे स्टेटस व्हाट्सअ‍ॅपवर ठेवले. नंतर ‘तुला हिंदूंचा फार किडा आला आहे का, तुझा उमेश कोल्हे करणार’ असा म्हणत त्याच्यावर हल्ला झाला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा या घटनेकडे खूप गांभीर्याने पाहत आहेत.

यामध्ये यामध्ये मुख्य आरोपी शाहरुख पठाण, इलाई महबूब शेख, अकीब कुदरत सय्यद, टिपू सरीम पठाण, साहिल शौकत पठाण, अरशद शरीफ पठाण, निहाल इब्राहिम पठाण, यांना आज अटक करण्यात आली. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदूत्ववादी संघटनांनी शुक्रवारी कर्जतमध्ये कडकडीत बंद पाळला तर काल, शनिवारी सर्व पक्षांच्या बैठकीत शांतता व संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले.

Spread the love
Exit mobile version