सध्या कांद्याला बाजार नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कांदा उत्पादनातून झालेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभा राहील आहे. मागच्या दोन दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये एका शेतकऱ्याने कांद्यामध्ये रोटाव्हेटर फिरवला होता. आता देखील असाच प्रकार कर्जत तालुक्यामध्ये घडला आहे.
मोठी बातमी! तब्बल ५ तासांनंतर रविंद्र धंगेकर यांच उपोषण मागे
कांद्याच्या दारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नागापुर येथील एका शेतकऱ्यानं कांद्यावर रोटाव्हेटर फिरवला आहे. सुभाष निंबोरे असं या शेतकऱ्याचे नाव असून या शेतकऱ्याने जवळपास एक एकरमध्ये रोटाव्हेटर फिरवला आहे.
भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाला आवडतो ‘हा’ बॉलिवूड अभिनेता; स्वतःच केला याबाबत खुलासा
कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळं याबाबत राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीनं करण्यात आली आहे. सरकारने कांदा उत्पादकांना मदत करण्यासाठी हस्तक्षेप न केल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी (Dr. Ajit Nawale) दिला आहे.
देशातील प्रमुख नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, संजय राऊतांचे मोठे वक्तव्य