चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री व अभिनेत्यांच्या अफेअर्स च्या चर्चा कायम होत असतात. सध्या प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) व हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशन यांच्या अफेअर ची चर्चा सुरू आहे. याआधी कार्तिक आर्यनचे नाव सारा अली खान सोबत जोडले गेले होते. भूल भुलैय्या 2 (Bhul Bhulaiya 2) या नुकत्याच येऊन गेलेल्या बहुचर्चित चित्रपटात कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत दिसला होता. त्यावेळी देखील तो चांगलाच चर्चेत होता. सध्या कार्तिक आर्यनने त्याच्या पश्मिना रोशन ( Pashmina Roshan) हिच्यासोबत असणाऱ्या अफेअर च्या चर्चांवर मौन सोडले आहे.
“शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच”, संभाजीराजे भोसले कडाडले
एका मुलाखतीत कार्तिक आर्यन याने याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. यामध्ये त्याने “मी एक सेलिब्रिटी आहे त्यामुळे माझ्या अनेक गोष्टी प्रेक्षकांसमोर येतील. माझी कुठल्या मुलीसोबत मैत्री असेल तर त्याला रिलेशनशिपचे लेबल लागते. यामुळे अनेकांच्या आयुष्यात समस्या निर्माण होतात. मी मात्र या गोष्टींचा त्रास होऊ नये म्हणून माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करतो.”
Ajit Pawar: अजित पवारांनी बारामतीचा रेडा घेऊन गुवाहाटीला जावं – अब्दुल सत्तार
यापुढे तो असेही म्हणतो की, “सोशल मीडियावर माझ्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात. याचा मला त्रास देखील होतो. या सगळ्या गोष्टींशी मी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मला समजून चुकले आहे की कलाकारांच्या आयुष्याला प्रायव्हसी मिळणं हे कठीण असत.” या मुलाखतीमध्ये कार्तिक आर्यनने त्याच्या अगामी चित्रपटांबद्दल देखील माहिती दिली.
गाई-म्हशीच्या दुधापेक्षा फायदेशीर ठरतंय शेळीचं दूध; ‘हे’ आहेत फायदे