Kartik Aaryan । ब्रेकिंग! बॉलीवूड स्टार कार्तिक आर्यनवर कोसळला मोठा दुःखाचा डोंगर

Kartik Aaryan

Kartik Aaryan । 13 मे रोजी मुंबईत आलेल्या जोरदार वादळामुळे एक अतिशय भीषण दुर्घटना घडली होती, घाटकोपरमध्ये अचानक आलेल्या वादळ आणि पावसामुळे घाटकोपरच्या छेडा नगर भागातील पेट्रोल पंपावर मोठा होर्डिंग कोसळला होता. या अपघातात तेथे उपस्थित असलेल्या सुमारे 16 जणांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे 74 जण गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी बॉलीवूड स्टार कार्तिक आर्यनचे नातेवाईकही याठिकाणी उपस्थित होते.

Baramati Vidhansabha | ब्रेकिंग! अजित पवार यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर

घाटकोपर येथे झालेल्या या भीषण अपघातात कार्तिक आर्यनला त्याच्या काका काकुला गमवावे लागले आहे. 13 मे रोजी मुंबईतील घाटकोपर भागातील पेट्रोल पंपावर 120×120 फूट आकाराचे होर्डिंग पडून सुमारे 16 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात कार्तिकचे काका आणि काकी यांचाही मृत्यू झाला आणि अपघातानंतर 56 तासांनंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Pune News । गैरधंद्यांना बसणार आळा, पुणे पोलिसांचे मोठे अश्वासन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आर्यनचे काका मनोज आणि काकी अनिता हे जबलपूरचे रहिवासी होते आणि त्यांना मुंबईहून इंदूरमार्गे जबलपूरला परतायचे होते. 13 मे रोजी दुपारी 4:30 च्या सुमारास जोरदार वाऱ्यामुळे 250 टन वजनाचा होर्डिंग त्याच्या लाल एसयूव्हीवर पडला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

Viral Video । धक्कादायक! विमानाच्या दरवाज्यातून व्यक्ती अचानक खाली पडली, कॅमेरात कैद झाला भितीदायक व्हिडिओ

Spread the love