बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Karthik Aryan) आणि क्रिती सेनन ( Kriti Sanon) यांचा ‘शहजादा’ ( Shehzada) चित्रपट १७ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई केली. पण दुसऱ्या दिवशीही ‘शहजादा’ चित्रपट कमाईच्या बाबतीत मागे पडला आहे. कार्तिक आर्यनच्या चित्रपटाला शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone)’पठाण’ (Pathan) चित्रपट टक्कर देत आहे.
हेल्मेट विकत घेताना ‘हे’ लक्षात ठेवाच! गोष्ट छोटी पण फायदा मोठा
शहजादा चित्रपटाकडून निर्मात्यांनी मोठी अपेक्षा ठेवली होती. त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले होते. तर कार्तिक आर्यननं त्याच्या ‘शहजादा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पार जिवाचं रान केलं. या चित्रपटाच्या म्युझिक, सॅटेलाइट आणि ओटीटी राइट्समधून निर्मात्यांनी ६५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. मात्र दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने फक्त ९ ते १० कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी हा चित्रपट पाहण्यासाठी एकावर एक फ्री तिकीट देण्यात आले होते.
राखी सावंतने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार; म्हणाली
दरम्यान, प्रचंड प्रयत्नानंतरही शहजादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुरत फसला गेला. ‘अला वैकुण्ठपुरामुलू’ या दक्षिण्यात चित्रपटाचा शहजाद हा चित्रपट रिमिक्स आहे. तसेच, रविवारची सुट्टी असल्यामुळे हा चित्रपटात पाहण्यासाठी गर्दी होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या चित्रपटाची निर्मिती रोहित धवनने केली आहे. रोहित धवनसोबत कार्तिकचा हा पहिलाच चित्रपट आहे. हा एक कॉमेडी चित्रपट आहे.