Site icon e लोकहित | Marathi News

कसबा-चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध होणार नाहीत; जयंत पाटील म्हणाले, “आज उमेदवार जाहीर….”

Kasba-Chinchwad by-elections will not be uncontested; Jayant Patil said, "Candidates announced today..."

पुणे : राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या-मोठ्या हालचाली होत आहेत. नुकत्याच काही पदवीधर मतदारसंघांच्या निवडणूका पार पडल्या. अशातच कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.4) महाविकास आघाडी आपले उमेदवार जाहीर करणार आहे. तर याच दिवशी भाजपची एक गोपनीय बैठक पार पडेल.

‘त्या’ एका चुकीमुळे आजपर्यंत मुख्यमंत्रीपद पदरात पडले नाही; अजित पवारांचा खुलासा!

या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी व भाजप समोरा समोर लढणार आहेत. कसबा व चिंचवड ( Kasba & Chinchwad Elections) येथील निवडणुका बिनविरोध होतील. अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सगळ्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. या निवडणुकांसंदर्भात काल तिन्ही पक्षांची बैठक पार पडली.

ब्रेकिंग! अखिलेश यादवांच्या ताफ्याला भीषण अपघात; चार जणांची प्रकृती गंभीर

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले की, “पुण्यातील कसबा पिंपरी चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र असणार आहे. आज (दि.4) महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली जातील.”

विद्यार्थ्यांच्यातच ताळमेळ नाही, MPSC चा नवीन अभ्यासक्रम २०२३ पासूनच लागू करावा या मागणीसाठी पुन्हा पुण्यात आंदोलन

कसबा पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध होण्यासंबंधित प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. भाजपने मुंबईमध्ये नाईलाजाने उमेदवार मागे घेतला होता. दरम्यान मागील काही दिवसांत राजकीय मर्यादा व साधन सुचिता यांचे संकेत पाळले जात नाहीत. असे जयंत पाटील यावेळी म्हणाले आहेत.

“मी शिवसेनेची साथ कधीच सोडणार नाही”, पराभवानंतर शुभांगी पाटील यांची प्रतिक्रिया

Spread the love
Exit mobile version