
पुण्यामध्ये कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात गडबड गोंधळ सुरू आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून याठिकाणी जोरदार प्रचार सुरू आहे. कसबा व चिंचवड या दोन्ही ठिकाणी आधी भाजपचे आमदार होते. यामुळे या दोन्ही निवडणूका भाजपसाठी आता प्रतिष्ठेच्या ठरल्या आहेत. दरम्यान कसबा (Kasba) मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. परंतु, सध्या कसब्यामध्ये चुरस आहे.
पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवार अखेर बोललेच; म्हणाले…
ही परिस्थिती पाहता भाजपचे आमदार गिरीश बापट ( Girish Bapat) आजारी असूनदेखील मैदानात उतरले आहेत. गिरीश बापट यांनी याआधी अनेक वर्षे कसबा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यामुळे त्यांचा शब्द कसब्यात अधिक महत्त्वपूर्ण ठरतो. यावेळी भाजपने ब्राम्हणेत्तर उमेदवार दिल्याने मतदार वेगळा निर्णय घेण्याची शक्यता होती. यामुळे भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्या प्रचारासाठी खुद्द गिरीश बापट आज मैदानात उतरले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा! राज्यात लवकरच 30 हजार शिक्षकांची भरती
यावेळी बापट म्हणाले की, ” ही निवडणूक आपण चांगल्या मतांनी जिंकणार आहोत. कार्यकर्ते पक्षाचे आत्मा आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी चांगले काम करा. गेले अनेक वर्षे या आत्म्याची सेवा करण्यात मी धन्य मानले. यावेळी आपला उमेदवार नक्कीच जिंकून येणार आहे. हेमंतचे काम चांगले आहे. थोडं अजून नागरिकांमध्ये पोहोचण्याची गरज आहे. थोडी ताकद लावा मी लवकर बरा होऊन परत येईल. “
बळीराजा चिंतेत! कलिंगडाच्या दरात मोठी घसरण झाल्याने कलिंगड शेतातच पडून